Pune News : पुण्यातून पर्यटनाला वाढती मागणी; महिन्याला 70% वाढ

एमपीसी न्यूज – “कोरोनानंतर कौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यातून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ महिन्याला 70 टक्के इतकी असून, स्थानिक पर्यटनात 300 टक्क्यांनी, तर परदेशी प्रवासात 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदवण्यात आले आहे. शिवाय, उत्सवाच्या आणि हिवाळ्याच्या हंगामामुळे कोरोनानंतर 55 टक्के पर्यटन पूर्वपदावर येत आहे,” अशी माहिती थॉमस कुक इंडियाचे कंट्री हेड आणि हॉलिडेज, माइस, व्हिसा विभागांचे प्रमुख राजीव काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतातील आघाडीची ‘इंटिग्रेटेड ट्रॅव्हल’ एजन्सी असलेल्या थॉमस कुक इंडियाच्या वतीने बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी वेस्ट इंडिया सेल्स हेड मीनल हाते, रेस्ट ऑफ महाराष्ट्र सेल्स हेड श्रेयस खापरे, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर मनीष कबरे, युरोप टूर मॅनेजर मिलिंद गायकवाड, इम्रान चौहान आदी उपस्थित होते.

राजीव काळे म्हणाले की, ‘पुणे ही थॉमस कुकसाठी अतिशय महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन व्यवसायामध्ये या शहराचा मोठा वाटा आहे. लॉकडाऊनमुळे आलेला थकवा आणि प्रचंड वाढलेल्या मागणीमुळे पुणेकरांमध्ये पर्यटनाची प्रचंड इच्छा दिसतेय. जून 2021 मध्ये निर्बंध शिथिल झाल्यापासून दर महिन्याला पर्यटनामध्ये 70% वाढ होताना दिसत आहे. आगामी उत्सवांचा हंगाम व हिवाळा, एक्स्पो दुबई 2020 आणि हनिमूनसाठी होणारे पर्यटन हे घटक पुण्यातील पर्यटन वाढीसाठी कारणीभूत ठरले आहेत.’

‘थॉमस कुक इंडियाच्या अहवालानुसार कोविडपूर्व पर्यटन प्रमाणाच्या सध्या 55% मागणी आहे. यात स्थानिक पर्यटनाच्या मागणीत 300% वाढ झाली आहे तर परदेशी पर्यटनामध्ये 50% वाढ झाली आहे. मालदिव्ह्ज, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया, तुर्की आणि इजिप्त या देशांमधील पर्यटनाला जास्त मागणी आहे आणि एक्स्पो 2020 दुबईलाही सध्या वाढती मागणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्या पुण्यातून वाढताना दिसत आहे आणि क्वारंटाइन पॅकेजेससह थॉमस कुक इंडियाने अमेरिका व कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे,’ असे राजीव काळे यांनी सांगितले.

‘थॉमस कुक इंडियाच्या भारतातील विस्तृत जाळ्यामध्ये पुण्यातील चार मालकीची/ फ्रान्चायझी आउटलेट्स (भांडारकर रोड, पुणे कॅम्प, विमाननगर आणि औंध) आणि महाराष्ट्रात मुंबई व पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर या महत्त्वाच्या टिअर 2-3 शहरांमध्ये एकूण 25 आउटलेट्स आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 77% व्यक्तींना 2021 या वर्षातच पर्यटन करण्याची इच्छा आहे. यामध्ये 62% व्यक्तींनी परदेशी ठिकाणांना पसंत केले आहे;, तर 78% व्यक्तींनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे; काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड; तसेच ईशान्य भारत, राजस्थान आणि अंदमानसाठी वाढती मागणी दिसून येत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

पुणेकरांना लडाख, काश्मीर, राजस्थान, दक्षिण भारतात बाइकिंग सारख्या आउटडोअर ऍडव्हेंचर सहली आवडतात. डोंगराळ प्रदेशातील ठिकाणे आणि एटीव्ही राइड्स व ऍपल ऑर्चर्डमध्ये पिकनिक लंच; अंदमान व समुद्रकिनाऱ्यावारील ठिकाणे व तेथील सी-कार्टिंग, स्नॉर्केलिंग इ. ऍक्टिव्हिज आवडतात.

स्वित्झर्लंड व फ्रान्समध्ये ख्रिसमस मार्केटच्या उत्सवांसह हिवाळी पर्यटन किंवा रशियातील लॅपलँड व नॉर्दर्न लाइट्स, नाइल क्रुझ, कप्पाडोसियामध्ये (तुर्की) हॉट एअर बलुनिंग आणि एक्स्पो दुबई 2020 ही आघाडीची लोकप्रिय ठिकाणे आहेत. कुटुंबे, मिलेनिअल्स/ तरुण प्रोफेशनल्स, हमिनूनर्स, बिझनेस आणि बी-लिझर्स, विद्यार्थी आणि आध्यात्मिक पर्यटन अधिक पसंत असल्याचे दिसते. पुण्यातील ग्राहकांना कुटुंबासमवेत किंवा अनेक पिढ्यांचा समावेश असलेला परिवार (50%); मित्रमंडळी/सहकारी (20%); जोडपी (25%); एकल (5%) पर्यटन करणे आवडते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.