Pimpri news: कोरोनाचा वाढता प्रसार; शहरातील उद्याने 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता महापालिकेचे शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

महापालिकेची शहरात विविध 105 उद्याने आहेत. उद्यानांमध्ये नागरिक एकत्र येतात. महापालिकेने उद्यान परिसरात कोरोनापासून बचाव करण्याबाबतची जनजागृती केली आहे. ज्येष्ठ नागरिक संघनांदेखील पत्र पाठविले आहे. काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्याने देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय , खासगी शिकवणी वर्ग गेल्या 3 आठवड्यापासून बंद करण्यात आले आहेत. तसेच, रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी कायम असणार आहे. त्यातून जीवनावश्यक वस्तू दूध, भाजीपाला, फळे पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांची वाहने वगळण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.