Ind vs Aus Test Series : तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 133, भारतावर 2 धावांची आघाडी

एमपीसी न्यूज – पहिल्या डावात भारतीय संघाने 326 धावांपर्यंत मजल मारत 131 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडला. मात्र, कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसऱ्या दिवसातलं अखेरचं सत्र खेळून काढले. दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ 6 गडी बाद 133 धावांपर्यंत मजल मारु शकला. कांगारुंना 2 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्स 4 धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनच्या चेंडूवर तो झोलबाद झाला. लाबुशेनने 28 धावा केल्या. यानंतर वेड आणि स्मिथ यांनी उरलेली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.

कर्णधार स्मिथ दुसऱ्या कसोटी सामन्यातही अपयशी ठरला, अवघ्या 8 धावा काढून तो बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने मॅथ्यू वेड, ट्रॅविस हेड आणि कर्णधार टीम पेन यांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर ग्रीन आणि कमिन्स यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघावर डावाने पराभवाची नामुष्की टाळली.

दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची संघ 6 गडी बाद 133 अशी स्थिती होती. भारताकडून रविंद्र जाडेजाने 2 तर बुमराह-यादव-सिराज आणि आश्विन या चौकडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.