Ind Vs Aus Test Series : दुस-या दिवसअखेर भारत 2 बाद 96 धावांवर, गिलचे पहिले कसोटी अर्धशतक

एमपीसी न्यूज – भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 338 धावापर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा डाव संपवून मैदानात उतरलेल्या भारताने दिवसअखेर दोन गड्यांच्या बदल्यात 96 धावा केल्या. शुभमन गिलने कसोटीतील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि तो बाद झाला. अजिंक्य रहाणे (5) तर, पुजारा (9) धावांवर खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या शतकीपारी (131), मार्नस लाबूशेनच्या (91) आणि विल पुकोव्हस्की याच्या (62) धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. लाबूशेननंतरच्या सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन खेळाडू जास्त तग धरू शकले नाहित. मॅथ्यू वेड (13), कॅमेरॉन ग्रीन (0), टीम पेन (1), पॅट कमिन्स (0), नॅथन लायन (0) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करत 24 धावा केल्या. जाडेजाने 4, बुमराह व सैनीने 2-2 तर मोहम्मद सिराजने 1 गडी बाद केला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संधाची सुरुवात देखील आश्वासक झाली. रोहित शर्मा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी 70 धावांची दमदार भागीदारी केली. रोहित शर्मा 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 26 धावांवर झेलबाद झाला. शुभमन गिलने कसोटीतील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि लगेचच तोही झेलबाद झाला. 10 चेंडूत 8 चौकारांसह त्याने 50 धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची स्थिती 2 बाद 96 धावा अशी होती. अजिंक्य रहाणे (5) तर, पुजारा (9) धावांवर खेळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.