Ind Vs Aus Test Series : 336 धावांवर इंडिया ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी

 

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना भारतीय टेल एन्डर्सनी चांगलच जेरिस आणंल. मराठमोळ्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली आहे.

शार्दूल ठाकूरनं 115 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीनं 67 धावांची खेळी केली. तर सुंदरनं 144 चेंडूचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 62 धावांची खेळी केली. सुंदर-शार्दुल या जोडीनं ब्रिस्बेनमध्ये सातव्या क्रमांकावरील सर्वात मोठी भागिदारी केली आहे. भारतीय संघाच्या टेल एन्डर्सनी 150 धावा धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या पंत आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या सत्रात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंत आणि मयांकला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. कर्णधार अजिंक्य रहाणे (37), रोहित शर्मा (44) ऋषभ पंत (23), मयांक अगरवाल (38), शुबमन गिल (3) आणि चेतेश्वर पुजारा (25) धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडनं सर्वाधिक पाच बळी घेतले. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला प्रत्येकी 2-2 बळी मिळाले. तर नॅथन लायनने एक गडी बाद केला. तिस-या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया संघाने बिनबाद 21 धावा केल्या आहेत. वॉर्नर 20 तर, हॅरिस 1 धावेवर खेळत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघाकडे 54 धावांची बढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.