Ind Vs Eng Test Series : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर ; विराट, हार्दिक, इशांतचं पुनरागमन

एमपीसी न्यूज – पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं संघाची घोषणा केली आहे. संघात कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचं पुनरागमन झालं आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर इंग्लड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

या सामन्यासाठी पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना वगळण्यात आले आहे. तर, अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

असा आहे भारतीय संघ 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, ऋषभ पंत , वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.