_MPC_DIR_MPU_III

Ind vs Aus Test Series : दुखापतीमुळे के. एल. राहुल मालिकेतून बाहेर

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी बायो बबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहित शर्मा यांच्या सह पाच भारतीय खेळाडूंना आयसोलेशन मध्ये जावं लागलं होतं. त्यानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के. एल. राहुलच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून वगळण्यात आलं आहे.

_MPC_DIR_MPU_IV

बीसीसीआयने आज सकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के. एल. राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज . एल. राहुलला दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि टि. नटराजन यांचा समावेश करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.