Ind Vs Aus Test Series : उमेश यादवच्या जागेवर टि नटराजनला संधी; रोहित शर्मा उपकर्णधार

एमपीसी न्यूज – भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे यादव आता उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार आहे. उमेश यादवच्या जागेवर भारतीय संघात टी. नटराजनला संधी मिळाली आहे.

रोहित शर्मा पुढच्या सामन्यांसाठी सिडनीत दाखल झाला असून त्याच्यावर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं होतं. दुखापतीमुळे उमेश तिसऱ्या सामन्यासाठी मुकणार आहे. त्याच्या जागेवर टी. नटराजनचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामन्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा संघात संघात दाखल झाला आहे. रोहितकडे संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दुखापतीमुळे रोहित संघाबाहेर होता. अकरा डिसेंबर रोजी झालेली फिटनेस टेस्ट पास करत रोहित शर्मा शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे. सिडनीत दाखल झाल्यानंतर रोहितने आपला फिटनेस सुधारण्याच्या दृष्टीकोनातून संघाचे फिजीओ व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवातही केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी सात जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर टिमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भरीव कामगिरी करत कांगारुवर विजय मिळवला.

आता तिसऱ्या सामन्यात आणखीनच चुरस वाढणार आहे. त्यामुळे क्रिडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.