Ind Vs Aus Test Series : आर. आश्विन- विहारीची उत्कृष्ठ कामगिरी, तिसरी कसोटी अनिर्णीत

एमपीसी न्यूज – आर. आश्विन- विहारीची उत्कृष्ठ कामगिरीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. विहारी-अश्विन दोघेही दुखापतग्रस्त असताना त्यांनी सहाव्या गड्यासाठी 259 चेंडूत 62 धावांची भागिदारी केली. बॉर्डर गावसकर मालिका 1-1 आशी बरोबरीत आहे.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात 334 धावापर्यंत मजल मारता आली. पाचव्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेच बाद झाला.

त्यानंतर ऋषभ पंतने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने 12 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत 118 चेंडूमध्ये 97 धावा कुटल्या.

पंत बाद झाल्यानंतर संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने 205 चेंडूत 77 धावा केल्या.

_MPC_DIR_MPU_II

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा खेळताना भारत विजयी होईल, अशी आशा होती. पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली.

रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त असताना हनुमा विहारीला देखील दुखपत झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झालं होतं. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना वाचवण्याच्या दृष्टीनं फलंदाजी केली.

अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीनं नाबाद 23 तर अश्विननं नाबाद 39 धावांची खेळी केली. अश्विन आणि हनुमा विहारीनं संयमी खेळी करत सामना वाचवल्याबद्दल दोघांच कौतुक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.