Ind Vs Aus Test Series : नवा निच्चांक, 46 वर्षांनंतर भारतानं लाजीरवाणा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली. दुसऱ्या डावांत भारतीय संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारता आली. 1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 42 धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता 46 वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम संघाने मोडला आहे.

भारताची दुसऱ्या दिवसाअखेर 9 धावांवर 1 बाद अशी स्थिती होती. त्यावेळी भारताकडे 62 धावांची आघाडी होती.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. पॅट कमिन्स आणि हेजलवूड यांच्या माऱ्यापुढे भारतीय संघाची फलंदाजी ढासळली.

_MPC_DIR_MPU_II

भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.

जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मयांक अग्रवाल, साहा आणि अश्विनसारखे फलंदाजांना एकामागोमाग एक माघारी धाडत ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफूटला ढकललं. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.

1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 42 धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता 46 वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.