Ind Vs Eng Test : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री कोरोना पॉझिटीव्ह, चारजण आयसोलेशनमध्ये

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून त्यांना पूर्णपणे अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याशिवाय गोलंदाज कोच बी अरूण आणि इतर तीन जणांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेट केलं आहे. दरम्यान संघातील सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह असून कसोटीच्या चौथा दिवसाचा खेळ आहे असा सुरू राहणार आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर,  आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल, सावधगिरीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी शास्त्री यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेट केले आहे, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपल्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांची आघाडी घेतली आहे. आज या कसोटीचा चौथा दिवस असून सामन्याच्या निकालाचे चित्र थोडेफार स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आज दोन्ही संघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.