Ind Vs Eng Test : पावसामुळे भारताच्या विजयावर पाणी, पहिला कसोटी सामना ड्रॉ

एमपीसी न्यूज – पावसाच्या व्यत्ययामुळे भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेला पहिला कसोटी सामना पाचव्या दिवशी ड्रॉ करण्यात आला आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 धावांची गरज होती. भारताला सामना जिंकण्याच्या मोठी आशा होती पण, पावसाने भारताच्या आशेवर पाणी फिरवले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर आटोपला. दुसऱ्या  डावात भारताकडून लोकेश राहुल लवकर माघारी परतला. चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद असून संघाने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. पण, पावसामुळे आजचा खेळ होऊ शकला नाही. अखेर सामना ड्रॉ करण्यात आला.

आता उभय संघात दुसरा कसोटी सामना लॉर्डसवर खेळला जाणार आहे. 12 ऑगस्टपासून हा सामना सुरू होईल.

संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 278 / दुसरा डाव – 52/1
इंग्लंडचा पहिला डाव – 183 / दुसरा डाव – 303

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.