_MPC_DIR_MPU_III

Ind vs Eng Test Series : अश्विनच्या फिरकीची कमाल, इग्लंड 134 वर ऑल आऊट

एमपीसी न्यूज – आर अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर निम्मा इग्लंड संघ तंबूत धाडला. फोक्सने केलेल्या 42 धावांच्या जीवावर इग्लंड संघाने 134 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला 195 धावांची आघाडी भेटली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

भारतीय संघ दुस-या दिवशी सर्व गड्यांच्या बदल्यात 329 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर इग्लंड कडवी टक्कर देईल असे वाटत होते. पण, भारतीय गोलंदाजापुढे इग्लंड संघ टिकाव धरू शकला नाही. एकाही फलंजाला 50 धावा देखील करता आल्या नाहीत. फिरकी पट्टू आर. आश्विनने पुन्हा एकदा कमाल गोलंदाजीचे दर्शन घडवत इग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्याने 43 धावांच्या बदल्यात 5 गडी बाद केले.

_MPC_DIR_MPU_II

इग्लंड कडून यष्टीरक्षक फोक्सने सर्वाधिक 42 धावा केल्या त्यानंतर पोपने 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त दुस-या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून सिराजने 1, अक्षर पटेल 2, इशांत शर्मा 2 गडी बाद केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.