IND Vs Eng Test Series : भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

एमपीसी न्यूज – इंग्लंडने दिलेल्या 49 धावांचे आव्हान भारतानं 7.4 षटकात पूर्ण केले. भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 81 धावांत संपुष्टात आली. इंग्लंडला नाममात्र 48 धावांची आघाडी मिळाली व भारताला विजयासाठी 49 धावांचे आव्हान मिळाले. भारताने हे आव्हान सहज पूर्ण करत दुसऱ्या दिवशीच सामना संपवला.

इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला होता. त्यानंतर लीच-रुट जोडीने 9 गडी बाद करत भारतीय संघाला 145 धावांत गुंडाळलं. रोहित शर्माची 66 धावांची खेळी वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ 33 धावांची आघाडी मिळाली होती. दमदार गोलंदाजीच्या जीवावर इंग्लंडने सामन्यात वापसी केली होती. पण, दुसऱ्या डावात इंग्लंड संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने 19 तर, बेन स्टोक्स याने सर्वाधिक 25 धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांत आटोपला आणि नाममात्र 48 धावांची आघाडी मिळाली. भारताला विजयासाठी केवळ 49 धावांचे आव्हान मिळाले. रोहित शर्माने 25 तर, शुभमन गिलने 15 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात सर्वाधिक अकरा बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.