Ind Vs Eng Test Series : शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ तयार

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून त्यातील पहिले दोन सामने चेन्नईला तर दुसरे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.

चार कसोटी मालिकेचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तसेच यावेळी संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल असे धडाकेबाज खेळाडूंचा संघाच्या फंलादाजीची धुरा संभाळणार आहेत. तसेच, अष्टपैलू हार्दिक पंड्याचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना भारतीय अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी देखील करून दाखवली. गोलंदाजीत चमक दाखवणा-या मोहम्मद सिराजचा देखील या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. जलद गती गोलंदाज इंशात शर्मा संघात आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, आर आश्विन, कुलदिप यादव, अक्षर पटेल हे गोलंदाजीची धुरा संभाळतील. संघातील यष्टीरक्षणाची जबाबदारी यावेळी रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना संघाला दुखापतीचा सामना करावा लागला. अनेक खेळाडू दुखापग्रस्त झाले आणि नवीन खेळाडूंचा संघात समावेश होत गेला. प्रत्येक खेळाडूने अप्रतिम कारगिरी करत आपल्या कौशल्याची चुनक दाखवली. भारत आणि इंग्लंड दरम्यान संघाकडे अनुभवी व तगड्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. फंलादाजीत आणि गोलंदाजीत संघाकडे आता समर्पक पर्याय आहेत. पाच तारखेपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.