Ind Vs NZ Test : अय्यर, सहाची झुंजार खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज – श्रेयस अय्यर याने केलेल्या 65 धावा आणि ऋद्दीमान सहा याच्या नाबाद 61 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 7 गाड्यांच्या बदल्यात 234 धावा केल्या. 49 धावांच्या आघाडीसह भारताने 283 धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडला विजयासाठी आता 284 धावांची गरज आहे.

 

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीय संघाने लवकर गडी गमावले. 51 धावांत 5 गडी गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी थोडा आधार दिला. या दोघांनी संघाची धावसंख्या शतकीपार केली. जेमीसनने अश्विनला बोल्ड करत ही भागीदारी मोडली. अश्विनने 32 धावांचे योगदान दिले. त्यानंतर चहापानापर्यंत श्रेयसने लढा दिला. त्याने 8 चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी केली.

 

श्रेयस बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा न्यूझीलंडसमोर उभा राहिला. त्याने अर्धशतकी खेळी करत भारताची आघाडी वाढवली. साहाने आधी श्रेयससोबत नंतर अक्षर पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. 81 षटकात 7 बाद 283 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. साहाने 4 चौकार आणि एका षटकारासह 61 तर पटेलने 28 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून साऊदी आणि जेमीसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

 

दरम्यान, न्यूझीलंड संघ 284 धावांचा पाठलाग करताना आपला पहिला गडी विल यंग याला गमावला आहे. अश्विनने यंगला 2 धावांवर पायचित केले. सध्या टॉम लॅथम (2) आणि विल्यम सोमरविले (0) धावांवर खेळत आहेत. संघाच्या धावा 4 झाल्या असून, आजच्या दिवसाचा खेळ संपला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.