IND vs SL ODI : भारतासमोर विजयासाठी 276 धावांचे आव्हान, भारत मालिका खिशात घालणार का ?

एमपीसी न्यूज – भारत आणि श्रीलंका दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद 275 धावांपर्यंत मजल मारली. भारताला विजयासाठी 276 धावांची गरज आहे. श्रीलंका संघाकडून फर्नोन्डोने 50 धावा केल्या तर, करुणारत्ने याने 44 धावा केल्या.

लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणे तीनशेचा टप्पा ओलांडता आला. शेवटच्या दोन चेंडूवर करुणात्नेने दोन चौकार खेचले. करुणारत्नेने 5 चौकारांसह नाबाद 44 धावांची खेळी केली. भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी 3 बळी घेता आले. दीपक चहरने 2 बळी टिपले.

भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील राहील, तर श्रीलंका मालिकेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.