-MPC-TOP-MOST-BANNER-I

Ind Vs SL ODI : भारतासमोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भारत आणि श्रीलंके दरम्यान एकदिवसीय सामन्यांना प्रारंभ झाला आहे. आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ उभे ठाकले आहेत. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने 50 षटकात 9 बाद 262 धावा केल्या असून, भारतासमोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य दिले आहे.

श्रीलंकेकडून चमिका करुणारत्ने याने सर्वाधिक 43 धावा केल्या, 35 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकराच्या मदतीने त्याने 43 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव, दीपक चहर, यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर, पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

शिखर धवन भारतीय संघाचे तर दासुन शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघात नवखे खेळाडू अधिक असून, भारतीय संघाचा कस लागणार आहे. आयपीएलचा अनुभव गाठीशी असल्यामुळे भारतीय संघ मालिकेतील पहिला विजय नोंदवतील अशी आशा क्रीडा रसिकांना आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.