Ind Vs SL T20 : कृणाल पंड्या कोरोना संक्रमित, दुसरा T-20 सामना पुढे ढकलला

एमपीसी न्यूज – भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची T-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्यानंतर आज उभय संघात दुसरा सामना रंगणार होता. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे दुसरा T20 सामना पुढे ढकण्यात आला आहे.

कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विलगिकरणात जावं लागलं आहे. या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना विलगिकरणातच रहावे लागणार आहे.

‘कृणाल पांड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे दुसरा T20 सामना स्थगित करावा लागत आहे. अन्य खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. सध्या सर्व खेळाडू विलगिकरणात आहेत,’ ANI या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका दरम्यान झालेली एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 2-1 जिंकली आहे. त्यानंतर सुरू झालेली T20 मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे तर, श्रीलंका मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.