Indapur : तिस-या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – तिस-या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला फिल्ममेकर्सनी गतवर्षीच्या तुलनेत उत्तम प्रतिसाद दिला. यंदाही या फेस्टिव्हलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून जवळपास १९४ शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या आहेत. त्यांपैकी निवडक १०० शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग १०, ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी केशर चित्रमंदिर, इंदापूर, पुणे येथे करण्यात येणार आहे.

मराठी, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली, कोकणी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतून संपूर्ण भारतातील शॉर्ट फिल्म याठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी रसिक प्रेक्षकांनी सोडू नये, प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे. पहिल्या दोन्ही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, कोलकत्ता, तामिळनाडू, नवी दिल्ली, राजस्थान, आसाम, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती फेस्टीवलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी दिली.

  • सहभागी होणाऱ्या स्पर्धत उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, संकलन, संगीत, अभिनय, पटकथा, बेस्ट ज्युरी अॅवार्ड अशा विविध गटांतील स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रथम उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १५ हजार रूपये पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १० हजार रूपये पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह, तृतीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी ७ हजार रूपये पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

तरी या फेस्टिव्हलच्या माध्यमातून शहरी कलाकारांप्रमाणे ग्रामीण भागांतील नव नवे चेहरे आणि ठसकेबाज विषय घेऊन बनवलेल्या शॉर्ट फिल्म आपल्याला पहायला मिळतील आणि यातूनच आपल्याला नवीन अभिनेते मिळतील. तसेच ग्रामीण भागांत शॉर्ट फिल्म म्हणजे नक्की काय असते हे समजायला मदत होईल. त्यासाठीच आम्ही याही वर्षी इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर शहराचे नाव फेस्टिव्हलच्या माध्यमातून सर्व चित्रपट क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फेस्टिव्हलचे ज्युरी सदस्य म्हणून मा.डॉ.चंद्रशेखर जोशी आणि मा.सुनिकेत गांधी हे काम पाहत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.