Indapur Crime News : गुटख्याविरोधात पोलीस आक्रमक, इंदापूर पोलिसांनी पकडला पाच लाखाचा गुटखा

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पोलिसांनी गुटखा विकणाऱ्या विरोधात मोहीम उघडली असून गुटका जप्त करण्याच्या कारवाया सुरु केल्या आहेत. इंदापूर पोलिसांनी ही दोन दिवसांपूर्वी गुटख्या विरोधात धडक कारवाई करत पावणे पाच लाखाचा गुटखा जप्त केला आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा बाजारपेठेतून इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी यावेळी संदीप प्रकाश कदम (वय 21) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्रात गुटखा विक्री व वाहतुकीस बंदी असतानाही गुलबर्गा बाजारपेठेतून सुगंधित गुटका, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुवासिक सुपारी खरेदी करून आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून इंदापूर ठाण्यापुढून जात होता.

दरम्यान गस्तीवर असणार्‍या पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये बंदी घातलेला व बेकायदा गुटखा सापडला. या कारमधून पोलिसांनी एकूण चार लाख 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.