Indapur Crime News : चोरट्यांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : इंदापूर शहरातील रस्त्यालगतची सहा दुकाने एकाच रात्री फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह विविध वस्तू चोरून नेण्याचा प्रकार काल रात्री घडला. त्यामुळे व्यावसायिकांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या चोरी प्रकरणी हनुमंत वामनराव पाटील (वय 30, रा. इंदापूर) यांनी इंदापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हनुमंत पाटील हे इंदापूर टेंभुर्णी नाक्याजवळ पार्वती गारमेंट कापड दुकान चालवतात. तसेच शेजारी त्यांच्या मालकीचे कृषी औषध विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते रात्री दुकान बंद करून गेले. दुसऱ्या दिवशी दुकान उघडताना त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे आढळून आले.  त्यांनी दोन्ही दुकानात पाहणी केली असता रोख रकमेसह दुकानातील माल चोरीस गेल्याचे समजले.

तसेच त्यांच्या शेजारी असणाऱ्या अतुल झगडे यांचे किराणा दुकान तसेच सुहास राऊत यांचे मेडिकल, मंगेश राऊत यांचे राऊत ॲग्रो सर्व्हिसेस, गणेश नेवसे यांचे इन्शुरन्सचे ऑफिस, सागर तोरस्कर यांचे कम्प्युटरचे दुकान काल रात्री फोडण्यात आले आहे. पैकी राऊत ॲग्रो सर्व्हिसेस, इन्शुरन्सचे दुकान वगळता दुकानातील रोख रकमेसह विविध वस्तू काल रात्री चोरट्यांनी लांबविल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पार्वती गारमेंट मधील 25 हजार रुपये, कृषी औषध दुकान 19 हजार रुपये, महालक्ष्मी किराणा दुकान 31 हजार 540 रुपये, समर्थ मेडिकल 9  हजार 800  रुपये, कम्प्युटर दुकान 2 हजार 275 रुपये, असा एकूण 87 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.

या घटनेप्रकरणी इंदापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात चोरट्यांनी सदरची चोरी केली असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.