Indapur News : सुभेदार लक्ष्मण डोईफोडे शहीद; इंदापूर तालुक्यावर शोककळा

एमपीसीन्यूज : इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावातील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे हे आसाम येते ड्युटीवर असताना मंगळवारी (दि.23 ) शहीद झाले. त्यामुळे बोराटवाडी परिसरासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून कर्तव्य बजावत होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली. यामध्ये सुभेदार डोईफोडे यांना वीरमरण आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या निधनाची बातमी इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या संदर्भात शोक व्यक्त केला आहे.

शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव शुक्रवारी ( दि. 26 ) बोराटवाडी या त्यांच्या गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्य्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.