Indapur : ग्रीन वूड क्रिएशनतर्फे नवोदित फोटोग्राफर आणि हौशी फोटोग्राफरसाठी फोटोग्राफी स्पर्धा

एमपीसी न्यूज – इंदापूर येथील ग्रीन वूड क्रिएशनतर्फे नवोदित फोटोग्राफर आणि हौशी फोटोग्राफरसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून येत्या जुलै महिन्यात केशर टॉकीज इंदापूर येथे पहिल्यांदा नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती फेस्टीवलचे दिग्दर्शक व आयोजक सोमनाथ जगताप यांनी दिली.

आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील फोटोग्राफरांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत विजेत्यांना विविध गटांतून २५,००० रूपयांची पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

  • या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी फोटोग्राफर प्रमाणे ग्रामीण भागांतील फोटोग्राफरनी काढलेले सुंदर फोटो आपल्याला पहायला मिळतील. यातूनच आपल्याला नवीन उत्तम फोटोग्राफर मिळतील. इंदापूर शहराचे नाव स्पर्धाच्या माध्यमातून सर्व कला क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असे सोमनाथ जगताप म्हणाले.

या स्पर्धेसाठी ३० जून पर्यंत प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत तसेच १५ जुलै पर्यंत उशीरा येणाऱ्या प्रवेशिका दाखल करता येतील तरी अधिक माहितीसाठी www.greenwoodcreation.com या वेबसाईटला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.