Indapur Rescue Operation Video: इंदापूरमधील पावसाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय जवळपास 24 तास होऊन अधिक वेळ इंदापूरमध्ये सलग पाऊस बरसतोय. इंदापूरमधील पावसात मदतकार्य करताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने निर्माण झालेल्या थरारक परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी भागांमध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहन पावसाच्या पाण्यात वाहून गेले अनेक ओढ्यांना आणि नाल्यांना पाणी आले आहे.

इंदापूर शहरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय शहरातल्या राम वेस नाका येथे महापालिका कर्मचारी पाण्यात वाहून जात असताना त्याला जेसीबी आणि केबलच्या सहाय्याने घेतल्याचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर बघायला मिळतोय.

याबाबत अधिक माहिती अशी की इंदापूरमध्ये रामवेस नाका भागात पाणी साचल्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी पाण्याला वाट करून देत होते नेमका त्याच वेळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि एक कर्मचारी खड्ड्यामध्ये अडकून बसला सुदैवाने जवळ जेसीबी असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला जेसीबी वर चढवून आणि केबल टाकून वर खेचण्यात आले आता हा थरारक व्हिडीओ वायरल होताना दिसत आहे.

नशीब बलवत्तर म्हणूनच तो कर्मचारी वाचला असं म्हटलं जातं अन्यथा पाण्याची ओढ बघता जेसीबी नसता तर मात्र दुर्घटना घडण्याची शक्यता होती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.