Indapur : शहा गावात दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे जिल्यातील इंदापूर तालुक्यामधील शहा गावात दोन सख्ख्या बहिणींचा भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२) अशी त्यांची नावे आहेत. या दोघींचाही मृतदेह बाहेर काढला आहे. या दोघी रविवारी पोहायला गेल्या होत्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शहा गावजवळील भीमा नदीच्या खोऱ्यात पूजा आणि सारिका पोहण्यासाठी गेल्या होत्या. पुजाला पोहता येत नसल्याने सारिका तिला वाचवण्यासाठी धावली. यात दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत असणारा बाळूने मुलींच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते मुलींच्या मदतीला धावले. मुलींचा शोध घेतला असता पुजाचा मृतदेह हाती लागला. मात्र, सारिकाचा मृतदेह सापडला नाही. अखेर प्रशासनाने पाणबुडीच्या मदतीने सोमवारी दुपारी १ वाजता सारिकाचा मृतदेह बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.