Molestation Case : रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तन, डॉ. धाडीवाल विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : क्लिनिकमध्ये उपचारासाठी (Molestation Case) आलेल्या रुग्ण महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील धाडीवाल पॉलिटेक्निक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. धाडीवाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तीस वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Chandan Nagar Crime : मैत्रिणीसोबत बोलल्याने दुसऱ्या मित्राने केला हल्ला

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला (Molestation Case) ही आजारी असल्यामुळे तपासणीसाठी डॉक्टर धाडीवाल हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. यावेळी आरोपीने उपचाराच्या नावाखाली लज्जास्पद व अपमानास्पद वाटेल अशा पद्धतीने फिर्यादी यांना स्पर्श केला. तसेच फिर्यादी सोबत अश्लील वर्तन देखील केले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.