Chinchwad : रस्टन कॉलनीत ‘इंडिपेंडन्स डे कप’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 

एमपीसी  न्यूज –  चिंचवड येथील रस्टन कॉलनीच्या वतीने महावितरण सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या “रस्टन  कॉलनी इंडिपेंडन्स डे कप” फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बारणे यांनी केले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, वैशाली मराठे, रस्टन कॉलनी सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ मालुसरे,मुख्य संयोजक संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गेली ११ वर्षापासून ही स्पर्धा घेतली जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ३० संघ सहभागी झाले. स्वातंत्र्य दिनी या स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल.१५ हजार,१० ह. असे प्रथम, द्वितीय विजेत्या संघाला बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती सौंदणकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर जैस्वाल यांनी केले. स्पर्धा आयोजनासाठी कुणाल सताळकर, रोहित शेळके, विवेक जोशी, चेतन जोशी, सौरभ ओव्हाळ, ऋषी कांबळे, शुभम महाजन, अथर्व माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.