Pimpri : कामगारनगरीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – चौकाचौकात ध्वजारोहण…, देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम…, साहित्य वाटप, वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम… अशा माध्यमातून पिंपरी-चिंचवड कामगारनगरीने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्वातंत्र्य दिन खास ठरला. दिमाखदार सोहळ्यात निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात असलेला देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यात आला. हजारो शहरवासियांनी आवर्जून याठिकाणी हजेरी लावली.  

व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मेजर प्रकाश सोंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भारतमाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू या राष्ट्रपुरुषांच्या भूमिकेत देशभक्‍तीपर गीतांवर नृत्य सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आपली भावी पिढी सक्षम होण्यासाठी कसे प्रयत्न करावे, हे सांगून जनजागृतीचा मोलाचा संदेश दिला. नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे व कुंदा भिसे, नारायण काटे, मनोहर काटे, डॉ. किरण भिसे, यशवंत शेळके, प्रवीण कुंजीर, प्रवीण काटे, सोमनाथ काटे, बाळकृष्ण परघळे, सुभाष भिसे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे व सविता आंबेकर यावेळी उपस्थित होते. अश्वथी पिल्ले व प्रतीक जगताप या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व देवेश महाडिक याने आभार मानले.

भारताचा 72 वा स्वातंत्रदिन डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ एक्सलन्स आणि कॉलेज ऑफ सायन्स, एम.बी.ए, तसेच ईंजिनिअरींग, वराळे येथील शाखेमध्ये मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल फेडरेशन संस्थेच्या ट्रस्टी अनुजा सुशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मान्यवरांबरोबर सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना करून राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीताच्या गायनाने सर्वत्र प्रसन्न, राष्ट्रप्रेम व ऊत्साहाचे वातावरण पसरले.

राष्ट्रध्वजारोहणानंतर शाळेतील तसेच कॉलेजच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर अभिमान व प्रोत्साहन देणारी काही भाषणे व गीतांचे सुमधूर आणि जोशात गायन करून सर्व वातावरण बदलून टाकले. एम. बी. ए. च्या विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणत्या उपाय – योजना करता येतील यावर एक छोटीशी बोधक नाटिका सादर केली. सर्व मान्यवरांच्या आभार प्रदर्शनानंतर मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समाजवादी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हातर्फे शहर कार्यालयासमोर झेंडावंदन करुन साजरा करण्यात आला. यावेळी दहावीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थींचा ट्रॉफी, वही, पेन, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. समाजवादी पार्टीचे युवाजनसभा राष्ट्रीय सचिव रतन सोनकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते साकीभाऊ गायकवाड, समाजवादी पार्टीचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सालारभाई शेख, प्रवक्ता नरेंद्र पवार, भोसरी विधानसभा अध्यक्ष जावेद शहा, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवि यादव, यश यादव, मोहसीन शहा, साजीद शेख, मारुती काळे, रामरुप यादव, मनोजकुमार यादव, रवींद्र यादव, श्याम कसबे, राहुल जाधव, महिला आघाडीच्या रुपाली गायकवाड, वहिदा शेख, वैशाली कसबे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने “तिरंगा सन्मान यात्रेचे “आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, या सन्मान यात्रेत परिसरातील अनेक आबालवृद्धांनी सहभाग घेतला, भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी  संरक्षण मंत्रालयाचे खाजगी सचिव अरुण ठाकूर, माजी सैनिक राजेंद्र जयस्वाल, अनिल यादव, लालासाहेब शिंदे,रघुवीरसिंग राणा, पोलिसी दलातील माजी कर्मचारी अशोक चव्हाण,वाल्मिक काटे, उमेश देशपांडे, सुरेश भालेराव, वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी धनाजी माळी, दतात्रय शिंदे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय  कार्याबद्दल अभिनव भिसे, महिला बचत गटातील रेखा आखाडे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी उन्नती सोशलफाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, पि. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, दिनेश काटे, सुरेश कुंजीर, सुनील कुंजीर, शंकर चौंधे, उधोजक राजू भिसे, रामप्रकाश वासनकर, निर्मलचंद उधोजी रोहिदास गवारे, अतुल पाटील, गणेश भिसे, विवेक तितरमारे, रंजना कुमार, अमित काटे यांच्यासह परिसरातील राजकीय , सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील तसेच आनंद हास्य क्लबचे सर्वच सदस्य व गुरुमाउली व ज्ञानाई भजनी मंडळाचे सर्व सभासद हजर होते.

भारत देशात जन्म घेतलेला प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी तिरंगा सन्मान यात्रा काढणे गरजेचे आहे. त्यामुळेच देशाची विविधतामध्ये  एकता अबाधित राहाणार आहे. जात, धर्म, पंथ विसरून सर्वांनीच अशा यात्रेत सहभागी होणे काळाची गरज असल्याचे उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

भारत माता कि जय,वंदे मातरम असा जयघोष करीत हि सन्मान यात्रा कुणाल आयकॉन रस्ता,शिवार चौक,कोकणे चौक,पिंपळे सौदागर गावठाण,स्वराज गार्डन चौक, गोविंद यशदा चौक मार्गे उन्नती सोशल फौंडेशनच्या कार्यालयाजवळ संपन्न झाली. यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला अशी तिरंगा सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच झाल्याची भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखविली मात्र अशा सन्मान यात्रा निघणे गरजेचे असल्याचेही भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. तात्या शिनगारे यांनी सूत्रसंचालन केले तर जगनाथ काटे यांनी आभार मानले.

आझाद मित्र मंडळ स्पोर्टस क्लब, ज्येष्ठ नागरिक कट्टा व आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्विकृत सदस्य विनोद तापकीर, आधाज मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, नगरसेवक विनोद नढे, बजरंग नढे, विशाल सपकाळ, महेश शिंदे, खंडु आव्हाज, विनायक मोरे, हरेश नखाते, गजानन नढे, ज्ञानेश्वर काळे, ज्येष्ठ नागरिक महादेव नढे, रमेश नढे, काटे मामा, लक्ष्मण मंजाळ व आझाद मित्र मंडळाचे सर्व सदस्य् उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. महात्मा गांधीची वेशभूषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.