Nigdi : स्वातंत्र्य दिनानिमीत्त निगडी येथे रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज –  भारतीय स्वातंत्र्याच्या (Nigdi) अमृतमहोत्सवा निमित्त निगडी येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन, लायन्स क्लब्स पुणे डिस्ट्रक्टच्या वतीने प्रो. ए. सोसायटीचे पुणेचे, मॉडर्न फार्मसी कॉलेज निगडी तसेच पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या सहकार्याने सोमवारी (दि.15) रक्तदान शिबिर व मोफत कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल सुनील चेकर यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन घेण्यात आले. समवेत रीजन चेअरमन अनिल झोपे, दिलीपसिंह मोहिते, माजी प्रांतपाल, शरदचंद्र पाटणकर, ओमप्रकाश पेठे, बी.एल जोशी, तसेच झोन चेअरपर्सन, सलीम शिकलगार, सुदाम भोरे, अंशुल शर्मा, जॉनी थदानी तसेच जेष्ठ लायन के. जी. मुनोत, श्रीकृष्ण मंदिराचे सचिव शशिधरन सी.पी. उपस्थित होते.

Health Checkup Camp : स्वातंत्र्य दिनानिमित्त खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

यावेळी 350 जणांना कोरोनाची मोफत (Nigdi) लस देण्यात आली व बूस्टर डोसही दिले गेले. तर, 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. गेली 34 वर्षापासून या उपक्रमाचे,आयोजन केले जात आहे.  या उपक्रमात रिजन 3 व 4 चे एकत्रित 21 क्लब सहभागी होते, तर पुणे रिजनमधून लायन्स क्लब पूना मुकुंदनगर, लायन्स क्लब पुणे सिनिअर्स, व लायन क्लब पुणे कल्चर यांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे संयोजन श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, लायन हरिदास नायर व राजीव कुटे यांनी केले होते. या प्रसंगी, ज्येष्ठ लायन के. जी. मुनोत यांच्या वतीने शैक्षणिक व वैद्यकीय मदतीकरिता, निवडक गरजूंना धनादेश देण्यात आले. यावेळी 45 हजार लसीकरण उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल शेखर पेठकर, व पिपंरी चिंचवड रक्तदान पेढी चे मकरंद शाहपूरकर व  उभरती कलाकार धनश्री घोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सविता निंबाळकर व ऋषीकेश मुसमाडे आदींनी विशेष परिश्रम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.