गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Independence Day : आयआयएमएसच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) वतीने सोमवारी (दि.15) स्वातंत्र्याचा (Independence Day) अमृत महोत्सव उत्साहात चिंचवड येथे साजरा करण्यात आला.

प्रमुख अतिथी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन विभागाचे वरिष्ठ प्रमुख संदीप बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी ग्रंथपाल पवन शर्मा व संस्थेच्या एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षक व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदीप बिडकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या (Independence Day) अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.

Talegaon Dabhade : इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पुनर्वापरायोग्य कापडी नॅपकिनची जनजागृती

spot_img
Latest news
Related news