Rawet : रावेत येथील महापालिका शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा

एमपीसी न्यूज – रावेत (Rawet) येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत सोमवारी (दि.15) अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण करत साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहणाच्या वेळी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका संगीता भोंडवे, रावेत गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोंडवे, किसन भोंडवे, नरेंद्र सोनटक्के, मनोहर भोंडवे, हैलकर, रजनीकांत भोंडवे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच, शिक्षक वृंद माध्यमिक विद्यालय रावेतचे इन्चार्ज पवार रामेश्वर, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Nigdi Tiranga Rally : तिरंगा रॅलीला नागरिकांकडून प्रतिसाद

अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे तसेच पर्यावरण संरक्षण प्रतिज्ञा, प्लास्टिक मुक्त भारत याची शपथ घेऊन मुलांना घर घर तिरंगा उपक्रम राबविताना (Rawet) ध्वजाचे पावित्र्य कसे राखावे. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.