Independence Day : दिशा संस्थेमार्फत शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

एमपीसी न्यूज  – दिशा संस्था गेल्या 20 वर्षांपासून मावळ तालुक्यातील महिला व युवती सक्षमीकरण व ग्रामविकासाचे कार्य करीत आहे. दिशा संस्था समाजातील विविध घटकांबरोबर विविध (Independence Day) प्रकारचे सामाजिक कार्य करते.

दिशा संस्थेच्या कार्यक्षेत्रातत वाडिवळे, वळक, मुंढावरे, फांगणे, बुधवडी, नेसावे, सांगिसे, वेल्हवळी, खांडशी, उबंरवाडी व कातकरीवस्ती अशी 11 गावे आहेत. या कार्यासाठी नेहमीच संस्थेला देसाई ब्रदर्स पुणे यांचे आर्थिक सहकार्य लाभलेले आहे.

या सर्व गावातील 11 शाळांमधील 300 गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडीयर रघुनाथ जटार, उपाध्यक्ष यशंवत लिमये व विश्वस्त इंदु गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रविण भोईरकर यांच्या हस्ते 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील शैक्षणिक (Independence Day) साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख सुहास धस, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या, सर्व ग्रामस्थ,महिला व दिशा संस्थेची टिम उपस्थित होती.

Talegaon Dabhade : उद्याच्या प्रगत भारतासाठी आजचे योगदान महत्त्वाचे – रामदास काकडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.