Independence day : श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयात प्रभातफेरीचे आयोजन

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याचा (Independence day) अमृत महोत्सव’ अंतर्गत हर घर झेंडा या उपक्रमात आकुर्डीच्या श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयात तिरंगा सन्मान रॅलीचे आणि प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभात फेरीत सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रभात फेरी श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय आकुर्डी येथून सुरू होऊन आकुर्डी गावातून विद्यार्थ्यांनी भारत मातेविषयी असणारी प्रतिष्ठा जागवण्यासाठी नारे दिले. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, हर घर तिरंगा , भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो असे विविध प्रकारे नारे देऊन भारत मातेविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनात प्रेम जागवून नागरीकांना घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी जनजागृती (Independence day) केली.

Independence day

प्रभात फेरी आकुर्डी गाव, म्हाळसाकांत चौक, प्राधिकरण, लोकमान्य हॉस्पिटल समोरुन परत विद्यालयात आली. मुख्याध्यापक सुनिल लाडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत उपप्राचार्य खुशालदास गायकर, उपमुख्याध्यापक सुधीर रोकडे, पर्यवेक्षिका सिंधू मोरे सर्व‌ शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयात निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, वेशभूषा, एकपात्री अभिनय, रांगोळी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. तसेच मुलांनी 75 वर्षाचा लोगो तयार करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या समर्पणाबद्दल ‘अभिवादन’ दिन साजरा करण्यात आला. प्रभातफेरीत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देण्यात आले व प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

Independence Day : एकता प्रतिष्ठानकडून डोणे गावात तिरंगा झेंड्याचे वाटप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.