Independence Day : देश सार्वभौम आहे, परंतु जनता नाही – डॉ. सुरेश बेरी

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानानुसार भारत हा सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. आज देश सार्वभौम आहे, परंतु देशातील जनता सार्वभौम नाही, असे मत लोकजागर ग्रुपचे संस्थापक डॉ. सुरेश बेरी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी (दि.15) आकुर्डीत स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) कार्यक्रमात बोलत होते.

लोकजागर ग्रुपच्या वतीने आकुर्डीत झेंडावंदन करण्यात आले. याप्रसंगी डी वाय एफ आयचे सचिन देसाई, व आम आदमी पक्षाचे प्रकाश हरवणे राम नलावडे, गोकुळ बंगाल, सुधीर मुरुमकर, स्वप्नील जेवढे, एकनाथ पाठक, तुकाराम साळवी, अरुण सपाटे,भविन भंडारी, मेघना बेरी आदी कार्यकर्ते व आसपासचे अनेक नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी ‘भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो’, स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

पुढे बोलताना लोकजागर ग्रुपचे संस्थापक डॉ. सुरेश बेरी म्हणाले, ‘भारतीय संविधानानुसार भारत हा सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. आज देश सार्वभौम आहे, परंतु देशातील जनता सार्वभौम नाही. ती राज्यकर्ते आणि इतर देशविघातक शक्तींच्या दबावाखाली आहे. या शक्तीमुळे देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. आज देशात प्रचंड महागाई व बेरोजगारी माजली आहे. या सर्वांना तोंड देत आपल्याला शतकाकडे जायचे आहे. या शक्तींच्या विरोधात सर्व जाती धर्माच्या लोकांना उभे करण्याची (Independence Day) प्रतिज्ञा आज आपण करूया, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Independence Day : कायदा व सुव्यवस्था सांभाळल्यानेच देश बलशाली होतो – विजयकुमार धुमाळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.