Independence Day: सामाजिक उपक्रम राबवत शहरात ठिक ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात ठिक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

निगडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक सचिन चिखले यांच्या हस्ते वृक्षारोपण केल्यानंतर उपस्थितांनी शंभर वृक्षांचे रोपण केले. या कार्यक्रमाचे आयोजन युवानेते जेकब मँथ्यू व स्थानिक नागरीकांनी केले होते.

गंधर्व नगरी फेज- 2 च्या क्लब हाऊस मध्ये, कोविड योध्याच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थलांतरित आणि गरजू लोकांना अन्नदान करणारे तसेच स्वछता कर्मचारी, विद्युत विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.

कार्यक्रमामध्ये दहावी आणि बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कोविड योद्धांचा कामाची दखल घेऊन त्यांचा शाल श्रीफळ तर महिलांसाठी साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलनासाठी  विश्राम कुलकर्णी आणि दादासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी फेडरेशन अध्यक्ष भुषण पाचारणे, सचिव सचिन सिसाळ आणि खजिनदार  कमलाकर गुंजाळ तसेच सोसायटी सदस्य यांचे सहकार्य लाभले.

संत साई शाळा, भोसरी

भोसरीतील संत साई शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्र गीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक वरुन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर, मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर, रुपाली खोल्लम, तेहमिन तहसिलदार, मनोज वाबळे, प्रमोद शिंदे, मृणाल लिमये, सुमित्रा शेट्टी,  भागवत वानखेडे, स्वाती मोघे, कांचन शिंगोटे, काशिनाथ कत्नाळी  आणि सर्व शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंगळे गुरव

पिंगळे गुरव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने शहीदांना आदरांजली वाहून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक सागर आंघोळकर व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांच्या हस्ते, गुणवंत कामगार, आण्णा जोगदंड, सूरेश कंक, प्रकाश घोरपडे, कवी शरद शेजवळ, याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिशू मंदिर शिक्षिका प्रतिभा मरडकेंद्र, संचालक प्रदीप बोरसे, पवण पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.