pimpri : स्वातंत्रदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे विशेष मुलांना वह्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे निगडी प्राधिकरण येथील सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सचिव रो. सुधीर मरळ व फंड रेसिंग डायरेक्टर रो. सचिन काळभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मांडके, विकास पाटोळे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, रो. शेखर चिंचवडे, रो. सुभाष वाल्हेकर, रो. गणेश बोरा, रो. वीरेंद्र केळकर, रो. वसंत ढवळे, रो. स्वाती वाल्हेकर, रो. मारुती उत्तेकर, रो. संदीप वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर आदी उपस्थित होते. सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रो. युवराज शामराव वाल्हेकर यांच्या नियोजनातून 200 मुलांना शालेय वह्या व खाऊंचे वाटप करण्यात आले.

प्रदीप वाल्हेकर म्हणाले, “सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक प्राणपणाने मागील 40 वर्षांपासून विशेष मुलांसाठी काम करत आहेत. आपण देखील या समाजाचा एक घटक आहोत. त्यामुळे या समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने अशा संस्थांना मदतीचा हात द्यायला हवा. विविध सण-उत्सवांचे औचित्य साधून संस्थेला मदत करायला हवी”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.