India bans PUBG : भारताने ‘पब्जी’सह 118 मोबाईल ॲप्लिकेशन्सवर घातली बंदी

एमपीसी न्यूज – भारतीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने पब्जी सह 118 मोबाईल ॲप्लिकेशन्सवर घातली बंदी घातली आहे. देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी या ॲप्लिकेशन्सवर बंदी घातल्याचे सरकारने म्हटले आहे.  

सरकारने पब्जी शोरूम 118 मोबाईल ऍप्लिकेशन्स बंदी घातली आहे यामध्ये, ॲप लॉक, बैदू, टन टन, लिव व्ही, कॅम ओसीआर, कॅम कार्ड यासारख्या काही प्रसिद्ध आपलिकेशन समावेश आहे.

भारत सरकारने जुलै महिन्यात टिकटॉकसह 59 चिनी ॲपवर बंदी घातली होती. टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक लोकप्रिय ॲपवर भारताने बंदी घातली होती. लडाखमध्ये सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर भारत सरकार निर्णय घेतला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.