Tokyo Olympics 2020 : भारत आता पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो : धनराज पिल्ले 

एमपीसी न्यूज : भारतीय खेळाडूंनी आज पटकवलेल्या ब्राँझ पदकामुळे भुवनेश्वरमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्डकप आणि 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ चांगला होऊ शकतो. टोकियोमध्ये ब्राँझ पदक मिळवणारी भारताची ही टीम पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकू शकते असा विश्वास माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केला. 

पिल्ले म्हणाले, आजच्या विजयाचा प्रवास केवळ एका दिवसापुरता नव्हता तर या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी या संघाला पाच वर्षाचा कालावधी लागला. बेल्जियम नंतर बलाढ्य जर्मनीसोबत खेळून त्यांना हरवणे सोपे नव्हते. आणि भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी यशस्वीरित्या करून दाखवली. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आज मिळवलेल्या यशाबद्दल शब्दात भावना व्यक्त करता येणार नाहीत.

कोण आहे धनराज पिल्ले

(जन्म : १६ जुलै, इ.स. १९६८) हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत.

धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.

भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.

धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बॅंक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर ॲंडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.