Pimpri : शहरातील विविध संघटनांच्यावतीने भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –   पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था व संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रमाने भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपरी न्यायालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे. के.एम. पिंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर,  अॅड. कालिदास इंगळे, अॅड. किरण पवार, अॅड. सुहास पडवळ, अॅड. जिजाबा काळभोर, अॅड. संजय दातीर पाटील,  अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड, गणेश राऊत, अॅड. योगेश थंबा,  अतिश लांडगे, अॅड. सुदाम साने, अॅड. केशव घोगरे आदी उपस्थित होते.
सिध्दार्थ मिञ मंङळ आईबाबा  प्रतिष्ठान आझमभाई पानसरे युवा मंच व सुनिल कदम मिञ परिवार च्या वतीने झेंङवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झेंङावंदन अ प्रभाग अध्यक्षा अनुराधाताई गोरखे याच्या हस्ते करण्यात आले . यावेळी नगरसेवक जावेद शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अ प्रभाग स्वीकृत सदस्य सुनिल कदम , तुषार ओसवाल , निखिल जाधव ,  अशोक वायकर, अण्णा कु-हाडे, हनुमंत वीर, अशोक शिंदे, स्वप्निल  सूर्यवंशी, शुभम सुर्यवंशी, आकाश गोरे , योगेश फंटागरे , रोहित सुर्यवंशी, अजित शेट्टी , अभि शिंदे  व पोलीस मिञ संघटनेचे अनिल पालकर व जेष्ठ कार्यकर्त उपस्थित होते .
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहन माजी नगरसेवक  कैलास थोपटे यांच्या हस्ते झाले. यावेळी  नगरसेविका निर्मला कुटे ,  लॉयेन्स क्लबच्या सदस्या रितू गुप्ता, नंदिनी गोखले, स्नेहा महाजन, इंदू सूर्यवंशी , शशी जाधव, सुहास जुनावने, मा. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,  संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार, संतोष सिंग, भगवान गोडांबे  व संस्थेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाबिश  उपस्थित होते. यावेळी लाईव्ह ऑलम्पीयाड स्पर्धेचे पारीतोषीक वितरीत करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.  यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विध्यार्थी, पालक कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन आस्था महतो  व स्नेहल गायकवाड  या दहावीच्या विद्यार्थिनीनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर स्कूलमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  मोठ्या उत्साहाने देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी शाळेचे संस्थापक संदीप काटे, संचालक निलेश काटे, मनीष कुलकर्णी, राजेश तोलानी, शाळेच्या  मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, स्वप्नील पाटील, कृपाली मेराई आदी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात 72 वा स्वातंत्र्य दिनांनिमित्त् ध्वजारोहन डॉ. बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्याच्या हस्ते महाविदयाल्यात शैक्षणिक, क्रिडा, आदी क्षेत्रात प्रविण्य् मिळविलेल्या विद्यार्थ्याना स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी  कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे ,प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम ,पी. आय. एमचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे, सी.ओ.ई. डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे , प्रतिभा इंटरनॅशल स्कूलच्या मुख्याध्यापिका  सविता ट्रॅव्हीस,  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. के. आर. पाटेकर, याच्या समवेत विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचीव डॉ. दीपक शहा म्हणाले, “अनेकांच्या बलीदानातून’ मिळालेल्या आपल्या देशातील स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्याचे अधिकार दिले नाही. युवा व आदीनी घर, समाज, विविध क्षेत्रातील संस्था सुधारणासाठीचे काम केले पाहीजे. युवा पिढीने बंधूभाव जोपासून. एकात्मतेना वाढविण्याचे कामे करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. वैशाली देशपांडे यांनी केले पाहुण्याची ओळख प्रा. अश्विनी तंटक यांनी तर आभर प्रा. सुनिता पटनाईक यांनी केले.

चिंचवड येथील ‘एसकेएफ’ इंडिया लि. या कंपनीच्या प्रांगणात सकाळी सव्वाआठ वाजता हब युनिटचे व्यवस्थापक राजेंद्र ताटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सुरक्षा अधिकारी भारतीय सैन्यदलातील निवृत्त सुभेदार आर. एम. मणी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. सुरक्षारक्षकांचे संचालन झाले. या वेळी एसकेएफ ग्रुप आयटी सेवा व्यवस्थापन प्रमुख जेन वोलमु, विघ्नहरी देव, दत्ता कांबळे, मिलिंद श्रीखंडे, रोहन फडके, हेमंत गाडे, महादेव जगताप, प्रसाद साकुरे, गणेश घाडगे, हमीद मुलाणी आदींसह कामगार-कर्मचारीवर्ग उपस्थित होता. एसकेएफ स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन आणि बक्षीस वितरण झाले. अश्फाक शेख यांनी संयोजन केले.
सारा सिटी फेज डी सहकारी गृहनिर्माण सहकारी सोसायटी, चाकण मध्ये 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजावंदन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक भगवान चौधरी, योगेश टेकाळे, सोसायटीचे खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे, गुलाबराव पाटील, सर्वेष पोरे, शंकर जाधव, अंजन महाराणा, सोमनाथ पाटोळे, प्रमोद टेकाळे, कलाप्पा सुतार, डी.जे. चव्हाण, विजय पाटणे, विलास वाघमारे, नितीन पडवळ, भोसले एस.एस.,  लहु काकडे, निलेश गुरव आदी उपस्थित होते. ध्वजवंदन, प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुलमध्ये 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भगवान चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले; तर भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रेया कीर्दक या विद्यार्थीनीचे आजोबा ज्ञानेश्वर कीर्दक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, अधिराज शितोळे, भटू शिंदे, तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.
स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत मूकनाट्य सादर करीत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर चिमुकल्यांना खाऊवाटप करण्यात आले.
अतुल शितोळे म्हणाले, प्रत्येकाने स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर असले पाहिजे. महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतः स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. पुलावर जाळी बसवूनही लोक जाळीच्या वरून कचरा नदीपात्रात फेकतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे, अशी चिंताही अतुल शितोळे यांनी व्यक्त केली. यावेळी आरती राव यांनी शाळेच्या आदर्श नियमांबाबत शिक्षिकांना मार्गदर्शन केले.

भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन मा.महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी  पिंपरी चिंचवड महानगरपालिका  कुदळवाडी प्राथमिक शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेमधे आलेल्या विद्यार्थांचा व मार्गदर्शक शिक्षक नानासाहेब भुतांबरे,संतोष भोते यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार केला.कार्यक्रमास अश्विनी  जाधव, स्विकृत सदस्य दिनेश यादव, मंगल  जाधव,आनंदराव  यादव,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा रहाटुळ, सय्यद मेहबूब,.मुरलीधर ठाकुर,.वनिता गुरव,.डॉ.सुनील यादव,.गुलाबराव बालघरे,.विशाल बालघरे,.शैलेश मोरे आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .संपत पोटघन व प्रस्ताविक विट्ठल बगाटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.