India-China Border Meeting: भारत-चीन तणाव निवळणार? दोन्ही देशांदरम्यान आज लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा

india china border meeting diplomatic talks on border issue laddakh today

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- महिन्याभरापासून सीमारेषेवर सुरु असलेला तणाव दूर करण्याचा एक मोठा प्रयत्न भारत आणि चीन दरम्यान आज (दि.6) होत आहे. काही वेळातच भारत आणि चीन लष्करातील लेप्टनंट जनरल स्तरावर चर्चा होणार आहे. भारत आणि चीन सैनिकांदरम्यान पूर्व लडाखमधील चार संवेदनशील क्षेत्रात वेगवान हालचाली सुरु आहे. दरम्यान, या चर्चेपूर्वी चीनने भारताशी लागून असलेल्या पश्चिमेकडील थिएटर कमांडच्या प्रमुखांना बदलले आहे. नव्या कमांडरचे नाव शू चिलिंग आहे. चीनने हे पाऊल का उचलले याबाबत मात्र काही समजू शकलेले नाही.

पेंगोंग त्सो मध्ये पाच आणि सहा मे रोजी हिंसक झडपीनंतर वेगवान हालचाली सुरु आहेत. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेप्टनंट जनरल हरिंदर सिंग हे करणार आहेत. हरिंदर सिंग हे लेह स्थित १४ व्या कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग आहेत. चिनीचे नेतृत्व तिबेट सैन्याचे जिल्हा कमांडर करणार आहेत. ही चर्चा पूर्व लडाखमधील चुशूल सेक्टरमध्ये माल्दो येथे सैन्य कर्मचारी बैठकीच्या ठिकाणी सुरु होईल.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत भारत कठोर भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात येते. चर्चेत चार असे मुद्दे आहेत की ज्यावर भारत कठोर राहण्याची अपेक्षा आहे. चीनचे सैनिक भारतीय परिसरातून मागे जावेत, अशी भारताची इच्छी आहे. एलएसीवर आघाडीच्या चौक्यांवर तैनात असलेले चीनचे सैनिक परत जावेत. गलवानमध्ये भारताचे पायाभूत सुविधांचे काम सुरु राहावे. त्याचबरोबर भारताला सीमेवर आणखी हिंसक चकमकी होऊ नये, असे आश्वासन भारताला हवे आहे. मागील महिन्यात झालेल्या चकमकीत दोन्हीकडील सैनिक जखमी झाले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.