India-China Clashes: गलवान खोऱ्यात ‘रहस्यमय’ आगीमुळे भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झुंज – जनरल व्ही.के. सिंग

India-China Clashes: Indian and Chinese troops clash over 'mysterious' fire in Galvan Valley - General VK Singh आतापर्यंत असा दावा केला जात होता की, कर्नल संतोष यांना फसवून मारण्यात आले. त्यानंतर भारतीय सैनिकांनी चिनी तंबूत आग लावली. त्यामुळे जनरल व्ही. के. सिंग यांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे,

एमपीसी न्यूज – गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री एक रहस्यमय आग लागल्यामुळे भारत-चीन सैन्यांदरम्यान चकमकीची ठिणगी पडली. चिनी सैनिकांच्या तंबूत ही आग लावण्यात आली होती, अशी माहिती मोदी सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

जनरल व्ही. के. सिंग म्हणाले की, लेफ्टनंट जनरल स्तरावर भारत आणि चीनमधील संभाषणात सीमेजवळ कोणतेही सैनिक उपस्थित राहणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. पण 15 जूनला संध्याकाळी कमांडिंग ऑफिसर सीमेवर तपासणी करायला गेले तेव्हा त्याने पाहिले की सर्व चीनमधील लोक परत गेले नव्हते. चिनी सैनिकांचे तंबू तेथे होते. कमांडिंग ऑफिसरने तंबू काढायला सांगितले.

दरम्यान, चिनी सैनिक तंबू हटवत असताना अचानक आग लागली. आगीनंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. भारतीय सैनिक चिनी सैनिकांना भारी पडले. दोन्ही देशांनी आपापल्या सैनिकांना बोलावून घेतले. हिंसक चकमकींमध्ये 40 हून अधिक चिनी सैनिक ठार झाले. हे खरं आहे, अशी पुष्टी जनरल व्ही. के. सिंग यांनी दिली.

16 जूनला मध्यरात्रीच्या सुमारास कर्नल संतोष यांच्यासह 20 भारतीय सैनिक शहीद झाले आणि भारत-चीन सैनिकांमधील हिंसक चकमकीत 43 चीनी सैनिकही मारले गेले. जनरल व्ही. के. सिंग यांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे, कारण आतापर्यंत असा दावा केला जात होता की, कर्नल संतोष यांना फसवून मारण्यात आले. त्यानंतर भारतीय सैनिकांनी चिनी तंबूत आग लावली.

सुरुवातीला भारतीय सैनिकांनी चीनच्या तंबूत आग लावल्याची माहिती पुढे आली होती. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, जनरल व्ही. के. सिंग हे मोदी सरकारमधील मंत्री आहेत आणि ते माजी सैन्य प्रमुख देखील आहेत, म्हणून ते हे थेट म्हणू शकत नाहीत. शक्य आहे की म्हणूनच त्यांनी या आगीला ‘रहस्यमय आग’ म्हटले असावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.