India-China Crisis: भारत खरेदी करणार 39 हजार कोटींची लढाऊ विमाने

India-China Crisis: India to buy fighter jets worth Rs 39,000 crore 31 हजार कोटी रुपये मेक इन इंडिया, म्हणजे भारतात अपग्रेड होणारे विमाने, पिनाका रॉकेट लाँचरचा दारूगोळा आदींवर खर्च होतील.

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत भारत लष्करी क्षमता आणखी मजबूत करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने अनेक नवीन संरक्षण साहित्य खरेदी आणि मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. एकूण 38,900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यात 12 एसयू-30 एमकेआय आणि 20 मिग-29 यांचा समावेश आहे. तसेच हवाईदलाकडे असलेली 59 मिग-29 लढाऊ विमाने अपग्रेड केली जातील. खरेदी व आधुनिकीकरणावर 18,148 कोटी रुपये खर्च येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने तिन्ही दलांच्या आवश्यकतेनुसार 38,900 कोटीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाने 248 अस्त्र क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासही मंजुरी दिली. ते हवाईदल आणि नौदलासाठी आहेत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 31 हजार कोटी रुपये मेक इन इंडिया, म्हणजे भारतात अपग्रेड होणारे विमाने, पिनाका रॉकेट लाँचरचा दारूगोळा आदींवर खर्च होतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्रपती निवडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. रशियात घटना दुरुस्ती करत अशी तरतूद करण्यात आली. यासाठी मतदान घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.