India-China Crisis: सीमेवर भारत-चीनमध्ये चकमक; एक अधिकारी, 2 जवान शहीद

India-China Crisis: Indian officer, two others killed in clash with PLA; casualties on both sides भारत आणि चीनदरम्यान सीमेवर शेवटची गोळी 70 च्या दशकात चालली होती.

एमपीसी न्यूज- पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना दोन्ही देशातील सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताने एक अधिकारी आणि दोन जवान गमावले आहेत. चीनचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही. या मोठ्या घटनाक्रमानंतर दोन्ही सैनिकांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.


भारत आणि चीनदरम्यान सीमेवर शेवटची गोळी 70 च्या दशकात चालली होती. गलवान खोऱ्यात सुमारे 50 वर्षांनंतर हा प्रकार घडला. गलवान खोऱ्यात चीनच्या लष्कराने घुसखोरी केली होती. चिनी सैनिक काही पॉईंट्स मागे गेले होते. परंतु, या घटनेनंतर सीमेवर तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत चिनी सैनिकांनी एलएसीवर आक्रमकपण दाखवला. पूर्व लडाखमध्ये चार जागांवर पीएलएने घुसखोरी केली होती. मोठ्या संख्येने चिनी सैनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असे उभे होते. गलवान खोरे आणि पेंगोंग तलाव, दोन मुख्य पॉईंट जिथे दोन्ही देशांचे सैनिका आमने-सामने आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.