India Corona Update : देशात सलग दुसऱ्या दिवशी 30 हजार नवे कोरोना रुग्ण, 295 मृत्यू

एमपीसी न्यूज – भारतात सलग दुसऱ्या दिवशी 30 हजार नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 30 हजार 256 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, 43 हजार 938 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एएनआयने कोरोना आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 34 लाख 78 हजार 419 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 27 लाख 15 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 18 हजार 181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 295 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 45 हजार 133 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. दरम्यान रिकव्हरी रेट देखील वाढून 97.71 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 55 कोटी 36 लाख 21 हजार 766 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 11 लाख 17 हजार 607 नमुने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 80 कोटी 85 लाख 68 हजार 144 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून गेल्या 24 तासांत देशभरात 37 लाख 78 हजार 296 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.