India Corona Update : देशात तीन लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्या कोरोना रुग्णापेक्षा अधिक असल्याने देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली आहे. सध्या देशात तीन लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी सर्वाधिक 1 लाख 60 हजार केरळमध्ये तर, 39 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 31 हजार 382 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 35 लाख 94 हजार 803 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 28 लाख 48 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चोवीस तासांत 32 हजार 542 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.78 टक्के एवढा झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 00 हजार 162 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 46 हजार 368 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 55 कोटी 99 लाख 32 हजार 709 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 65 हजार 696 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 84 कोटी 15 लाख 18 हजार 026 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून गेल्या 24 तासांत देशभरात 72 लाख 20 हजार 642 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.