India Corona Uodate: देशात ओमायक्रॉन रुग्ण 10 हजारांवर; कोरोनाचे 3 लाख 37 हजार नवे रुग्ण, 488 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : देशात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 2,42,676 एवढी आहे. राज्यात सध्या 21,13,365 सक्रिय रुग्ण आहेत. तर आता देशात कोरोनाबाधित होण्याचा दर 17.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात सध्या 10,050 ओमिक्रॉन रुग्ण झाले आहेत. त्यामुळे यामध्ये 3.69 टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे.

 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 33 हजार 533 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
आहे. शनिवारपेक्षा 4,171 रुग्ण कमी झाले आहेत.
2. देशात सध्या 21.87 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
3. भारताचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.78 टक्क्यांवर पोहोचला आहे.

4. गेल्या 24 तासांत देशभरात 525 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5. चोवीस तासांत 2 लाख 59 हजार 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 93.18 टक्के एवढा आहे.
6. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 71.55 टक्के प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 18.75 लाख चाचण्या पार पडल्या.
7. देशात सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवार, शुक्रवारी आणि शनिवारी देखील तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते.
8. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
9. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 161.92 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.