India Corona Update : 1.9 कोटी पैकी 1.6 कोटी कोरोनामुक्त, 24 तासांत 11,610 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 610 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 37 हजार 320 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 06 लाख 44 हजार 858 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 36 हजार 549 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 79 लाख 77 हजार 229 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 44 हजार 931 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.16) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 100 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 913 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.42 टक्के एवढा आहे‌. देशात आतापर्यंत 89 लाख 99 हजार 230 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 9 लाख 16 हजार 568 जणांना लस टोचण्यात आली आहे त्याखालोखाल महाराष्ट्रात 7 लाख 19 हजार 371 जणांना टोचली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.