India Corona Update: कोरोना उद्रेक ! 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू, एका आठवड्यात देशात 4.1 लाख रुग्णांची वाढ

India Corona Update: Corona Outbreak 1,007 deaths in 24 hours, an increase of 4.1 lakh patients in a week in the country दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 15 लाख 35 हजार 744 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात तब्बल 1,007 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर 62 हजार 064 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे देशात 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान तब्बल 4.1 लाख रुग्णांची वाढ झाली आहे.

मागील 24 तासांत झालेल्या 1,007 कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृतांची संख्या 44 हजार 386 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 15 हजार 075 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 34 हजार 945 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 15 लाख 35 हजार 744 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याची टक्केवारी 69.33 टक्के एवढी झाली आहे. देशातील मृतांची टक्केवारी देखील घसरली असून ती सध्या 2 टक्के आहे.

देशात आजवर 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 कोरोनाचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 4 लाख 77 हजार 023 चाचण्या रविवारी (दि.9) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे. बिहार, महाराष्ट्रात कोरोनाच्या संक्रमाणाचा वेग जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. झारखंडमध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजारहून अधिक झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.