India corona Update : गेल्या 24 तासात 11,929 नवे रूग्ण, एकूण 3.20 लाखांपैकी 1.49 लाख सक्रिय रुग्ण

India corona Update: 11,929 new patients in last 24 hours, 1.49 lakh active patients out of a total of 3.20 lakh देशातील 1.62 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात. आतापर्यंत 9195 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात सलग दुसऱ्या दिवशी अकरा हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात देशात 11 हजार 929 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 311 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 3 लाख 20 हजार 922 कोरोनाग्रस्त आहेत. एकूण रुग्णांपैकी 1 लाख 49 हजार 348 सक्रिय रुग्ण असून 1 लाख 62 हजार 379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात 311 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 9 हजार 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकडेवारीत भारत हा जगात नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यात दिवसेंदिवस सर्वाधिक रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रात दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असून महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या एक लाखाच्या पुढे पोचली आहे. तर, आजवर 3493 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तमिळनाडू रुग्ण संख्यामध्ये दुसऱ्या स्थानावर असून या राज्यात मध्ये 40 हजार 698 एकूण रुग्ण आढळून आले आहेत पैकी 1 हजार 982 जणांनी आपला जीव गमावला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिल्ली देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. राजधानी दिल्ली मधील वाढत्या करणार रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 38 हजार रुग्णांची नोंद झाली आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेऊन देशातील कोरोना बद्दल स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लक्षणांमध्ये तोंडाची चव जाणे व वास येण्याची संवेदना नाहीशी होणे यांचा नव्याने समावेश आहे. कोरोना विषाणूचा उगम झालेल्या चीन देशात या विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून काल 57 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.